एक ते ठाकरे…एक हे ठाकरे

चौकीदार चोर आहे असं जाहिरपणे सांगणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल शब्दात बदल केला. निवडणुक प्रचारादरम्यान ते चौकीदार या शब्दाचे ‘कौतुक’ करत आहेत. आधी तेच चौकीदार चोर आहे, म्हणाले होते.

एक ते ठाकरे होते जे बोलले की त्यावर ठाम राहात. प्राण गेला तरी बेहत्तर पण शब्द मागे घेत नसत. आणि एक हे ठाकरे आहेत की जे वेळोवेळी शब्दात बदल करतात. पाच वर्षे भाजपवर कडवट टीका केली आणि सत्तेसाठी पुन्हा भाजपशी युती केली.
आणि आता चौकीदाराचे जाहिर कौतुक करणे हे शिवसेनेच्या अंगलट येणार आहे. सातत्याने भुमिका बदलल्याने मतदारांची विश्वासहर्ता कमी होते. त्यामुळे कधीच शब्दात बदल न करणारे एक ते ठाकरे आणि वेळोवेळी शब्दात बदल करणारे एक हे ठाकरे….

-विनोद सूर्यवंशी, अहमदनगर

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*