विळ्या भोपळ्याचं वैर संपुष्टात; आ. गोटे पवारांच्या भेटीला

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल गोटेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. नुकत्याच झालेल्या धुळे महानगरपालिकेत गोटेंनी भाजपविरोधात कार्यवाही केली होती. ते काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत आणि त्यांनी ते वेळोवेळी जाहीरपणे बोलून दाखवले आहॆ. लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात लढण्याची तयारी ते करत आहेत. मला पक्षातील घाण साफ करायची आहे. त्यासाठीच मी पवार यांची भेट घेतली आहे. आता ते मला कशा पद्धतीने मदत करतील हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. गेल्या दोन तीन दशकांपासून पवार आणि गोटे यांचे वैर आहे त्यात आजच्या या भेटीमुळे अनेकांना बसला आहे. आता गोटेंच्या या भूमिकेमुळे भाजपसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरुपी शत्रू किंवा मित्र नसतो, असं गोटेंनी पवारांच्या भेटीनंतर म्हटलं. तसेच पवार यांची ते पुन्हा भेट घेणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*