ठाकरे पुन्हा पवारांच्या भेटीला …

काल मोदी आणि अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. सोबतच फडणवीस याना त्यांच्या ठाकरी शैलीत प्रत्युत्तर दिले. मोदी आणि शहा याना हटवण्यासाठी प्रचार करू, याचा फायदा आणि तोटा कुणाला होईल याच्याशी घेणे देणं देणे नाही असेही त्यांनी भाषणात सांगितले. आणि आज अचानक त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. यात विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली असे त्यांनी माध्यमांना सांगितले. पुण्यात झालेल्या राज आणि पवार यांच्या मुलाखतीनंतर त्यांची वाढती जवळीक हा चर्चेचा विषय ठरतो आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज यांनी काँग्रेसवर टीका केली होती त्याचा सरळ सरळ फायदा भाजप ला झाला होता. आता यावेळी ते भाजप वर टीका करतील आणि त्याचा नकळत फायदा आघाडीला होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*