अहमदनगर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून आ. संग्राम जगताप

अहमदनगर:

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधे उमेदवारीसाठी जो संघर्ष झाला तो सर्व महाराष्ट्रात गाजला. आता या निवडणुकीच्या रणसंग्रामात राष्ट्रवादीकडून आ.संग्राम जगताप यांचे नाव निश्चीत झाले आहे.

सर्व राजकीय समीकरणांचा विचार करत जगताप यांच्या उमेदवारीचा विचार केला आहे. अहमदनगरचे राजकारण हे सोयर्या-धायर्याचे राजकारण आहे. त्याचाच विचार करत पक्षाकडून हे नाव निश्चीत केले आहे. जगतात हे तरूण आहेत.

तरीही आघाडीमधे झालेली बिघाडी ही तशीच राहिल. कारण विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे हे प्रचारात उतरणार नाहीत. सोबतंच काँग्रेसमधे असलेले पण विखे समर्थकही कुणाचा प्रचार करणार हा प्रश्न उरतोच, अशी चर्चा आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*