मोहितेंची वाट लावण्यासाठी बारामतीकरांची व्यूहरचना..!

सोलापूर :

मोहिते पाटील गटाने ऐनवेळी बंडखोरी करून भाजपची वाट धारल्याने त्यांची वाट लावण्यासाठी बारामतीकर सरसावले आहेत. काहीही करून माढा लोकसभेची जागा राखण्यासाठी दमदार उमेदवार आणि व्यूहरचना तयार करण्यासाठी राष्ट्रवादी बैठकांवर बैठका घेत आहे.

खासदार विजयसिंह मोहिते यांच्याऐवजी युवा नेते माजी खासदार रणजितसिंह मोहिते यांना माढ्यातून उमेदवारी मिळण्यासाठी मोहिते गट प्रयत्नशील होता. मात्र, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील इतर पक्षाचे आमदार, नेते व कार्यकर्ते यासाठी तयार नव्हते. त्यामुळेच ज्येष्ठ नेते व पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यास ठाम नकार दिला. यामुळे दुखावलेल्या मोहिते गटाने भाजपवासी होत बंडाचे निशाण फडकविले, असे सांगण्यात येते.

आता माढ्यातून भाजपतर्फे रणजितसिंह मोहिते यांना उमेदवारी मिळणार आहे. अशावेळी येथून दमदार आणि सर्वमान्य उमेदवार देऊन मोहिते गटाची वाट लावण्यासाठी बारामतीकर पवार यांचा गट कामाला लागला आहे. त्यासाठी आज पुन्हा पक्षाची बैठक सुरू आहे. या बैठकीत सर्व बाजूने चर्चा करून उमेदवार जाहीर केला जाणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*