सु’जय’साठी राधाकृष्ण विखेही लागले कामाला?

अहमदनगर :

राष्ट्रवादी काँग्रेसने नगरचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिल्याने लोकसभेची जागा जिंकण्यासाठी विखे गटही कामाला लागला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी त्यासाठी श्रीगोंदा व पाथर्डीत खासगी बैठका घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

डॉ. सुजय विखे यांना भाजपची उमेदवारी मिळण्यासाठी फक्त औपचारिकता बाकी असल्याचा विखे गटाचा दावा आहे. तर, जगताप यांनी यंत्रणा दक्षिणेच्या गावोगावी जोमाने काम करीत आहे. यंदा आरपारची लढाई लढून राष्ट्रवादीकडे ही जागा खेचण्यासाठी जगताप यांनी यंत्रणा कामाला लागली आहे. त्यामुळेच नगर दक्षिणेकडे प्रचाराला फिरकणार नसल्याचे जगजाहीर सांगणाऱ्या राधाकृष्ण विखे यांनाही आता प्रचारात उतरण्याची गरज वाटली आहे. मात्र, राधाकृष्ण विखे यंदा अशीच खासगी बैठकांतून मुलाचा प्रचार करणार की जगजाहीर सभा घेणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*