शिवेंद्रसिंह राजेंना मिच निवडून आणणार : उदयनराजे

सातारा :

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या भावंडांचा वाद सर्वश्रुत आहे. पण या वादावर पडदा टाकत शिवेंद्रसिंह राजेंना मिच निवडून आणणार असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मागे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच आता राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी हे मनोमिलन घडवून आणले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या अणि काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना निवडून आणणार असल्याचेही उदयनराजेंनी सांगितले. यावेळी उपस्थित असलेल्या माध्यमप्रतिनिधींनी गळाभेट कधी घेणार असे विचारताच लवकरंच गळाभेटही घेतलेली दिसेल असेही त्यांनी सांगितले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*