‘सोलापूर का खासदार, आंबेडकर का वारीसदार’

मुंबई :

बरेच दिवस लोकांना नेमकेपणाने अंदाज येत नव्हता की आंबेडकर कुठून लढतील. अबकी बार सोलापूर का खासदार, आंबेडकर का वारीसदार अशी घोषना देत सुजात आंबेडकरांनी मोठी माहिती दिली.

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांना सोलापूरकरांनी विनंती केली होती की तुम्ही सोलापूरमधूनच लढावे त्या विनंतीला मान देऊन बाळासाहेब आंबेडकर सोलापूरातुन लढणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी माध्यमांना दिली. तसेच स्वतः सुजात हे महिनाभर प्रचारासाठी सोलापूरात मुक्कामी असतील असेही त्यांनी सांगितले. आता आंबेडकर सोलापूरातुन लढणार असल्याने सुशिलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*