शिरूरमधून आढळराव, तर मावळात बारणे यांना उमेदवारी

पुणे :

लोकसभा निवडणुकीची पहिली मतदार यादी शिवसेनेने जाहीर केले आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर व मावळ या दोन्ही मतदारसंघात विद्यमान खासदारांनाच पक्षाने पुन्हा निवडणूक रिंगणात उतरविले आहे.

शिरूरमधून तीन वेळा खासदार झालेल्या आढळराव पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने रिंगणात उतरली आहे. आता येथून आढळराव पाटील विरुद्ध डॉ. कोल्हे अशी जोरदार लढत रंगणार आहे. तर, पुण्यासह कोकणातील रायगडला जोडणाऱ्या मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देत पक्षाने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्याशी बारणे यांची लढत होणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*