शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांनाच उमेदवारी

अहमदनगर :

जिल्ह्यातील शिर्डीच्या आरक्षित जागेवर शिवसेनेने पुन्हा एकदा विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाच उमेदवारी देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

खासदार लोखंडे मागील पाच वर्षात मतदारसंघात विशेष फिरले असल्याचा आरोप करीत इच्छुकांनी भाजपतर्फे उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. मात्र, मुंबईत जोरदार फिल्डिंग लावत लोखंडे यांनी उमेदवारी कायम राखली आहे. काँग्रेसने या मतदारसंघातून श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या राखीव जागेवर आता लोखंडे विरुद्ध कांबळे अशी लढत होईल. त्यात विखे गटाचे दान कोणाच्या पारड्यात पडणार यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*