माढ्यामध्ये मोहिते विरुद्ध शिंदे लढत पक्की

सोलापूर :

मोहिते गटाने राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपकडून माढा लोकसभेच्या उमेदवारीचा शब्द घेतला आहे. त्यालाच काटशह देत बारामतीकरांनी सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपच्या मदतीने अध्यक्ष झालेल्या संजय शिंदे यांना राष्ट्रवादीत घेतले आहे. त्यामुळे माढ्यातून यंदा मोहिते विरुद्ध शिंदे अशी चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत.

खासदार विजयसिंह मोहिते यांच्याऐवजी रणजितसिंह मोहिते यांना उमेदवारी न देण्याबाबत अनेकांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना गळ घातली होती. त्यामुळे यंदा पुन्हा विजयसिंह यांनाच उमेदवारी देण्याची तयारी पक्षाने केली होती. मात्र, ते न पटल्याने मोहिते पाटील गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य करीत भाजपवासी होण्याचा निर्णय घेतला. भाजपने रणजितसिंह यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिल्याचे समजते. त्यालाच शह देण्यासाठी आता भाजपला खिंडार पाडीत संजय मामा शिंदे यांना रिंगणात उतरविण्याची तयारी पवार साहेबांनी केली आहे. त्यानुसार शिंदे राष्ट्रवादीच्या गोटात सहभागी होत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*