काँग्रेसमध्ये बेबनाव; कार्यकर्ते संभ्रमात

अहमदनगर :

नगरमधे काँग्रेसवर नामुष्कीची वेळ आल्याचे केविलवाणे चित्र आहे. एक जिल्हाध्यक्ष असताना दुसऱ्याची निवड करण्यात आलेली आहे. दोघेही पदावर दावा करीत असल्याने हा बेबनाव कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे.

विखे पाटील हाच आमचा पक्ष आहे म्हणणारे कार्यकर्ते जिल्हाभर आहेत. राधाकृष्ण विखे हे काँग्रेसमधे आणि सुजय विखे हे भाजपमधे त्यामुळे विखे हाच पक्ष म्हणणारे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. फक्त कार्यकर्तेच नाही तर पदाधिकारी सुद्धा संभ्रमात आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार यांनीसुद्धा भाजपमधे प्रवेश केला असे समजून करण ससाणे यांची या पदावर निवड करण्यात आलेली आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार हे अद्यापही पदावर असल्याचा दावा करतात. करण ससाने यांची निवड करण्यात आली आहे. आ.बाळासाहेब थोरात यांनी ही निवड करवून आणली. त्यामुळे विखे-थोरात गटात थेट जिल्हाध्यक्ष पदावरून वाद निर्माण झाला आहे. कार्यकारिणी बरखास्त न करता नव्या निवडी झाल्याच कशा, असा प्रश्न जुन्या काँग्रेसी कार्यकर्त्यांना पडला आहे. या सर्व घडामोडीत काँग्रेसला फक्त काँग्रेस संपवू शकते हे खरे ठरताना दिसत आहे. तसेच मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असलो तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे कुठलेच काम करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*