मुंडेंच्या विरोधात बीडमध्ये शेतकरी संघटनेतर्फे अर्ज..!

बीड :

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासह देशात बळीचे राज्य आणण्यासाठीची घोषणा करीत यंदा शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणुकीत उडी घेतली आहे. भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्याविरोधात बीडमध्ये संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

आज जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांचा बीड लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना सोबत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आजीमोद्दीन भाई शेख, अनुरथ काशीद, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष रामेश्वर गाडे, ऊसतोडणी कामगार शेतकरी संघटनेचे आनंद भालेकर, माजलगाव तालुकाध्यक्ष सुभाष आबा मायकर, क्रांती सिंह नाना पाटील ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सावंत, जे. डी. देशमुख, निलाराम टोळे, आनंद शिंदे, महेश साखरे, वैभव रंधवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*