सोनवणेंच्या उमेदवारीचा खासदार मुंडेंनी घेतला धसका

बीड :

खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना भाजपने बीडमध्ये पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीत मुंडे साहेबांच्या निधनामुळे सहानुभूतीच्या लाटेत त्यांना विक्रमी मतदान मिळाले होते. मात्र, आता साडेचार वर्षांत त्यांनी विकासकामांना मूर्तरुप दिलेले नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांनी मुंडे गटावर टीका केली आहे. त्याचाच धसका घेऊन मुंडे गट प्रचाराला लागला आहे.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादीने सोनवणे यांच्या बाजूने जोरदार ताकद उभी केली आहे. त्याचाच धसका घेत मुंडे गटाने फोटोशॉप आणि व्हिडीओ एडिटर यांचा आधार घेऊन सोनवणे यांच्याबरोबर राष्ट्रवादी नसल्याच्या अफवा पेरल्या आहेत. यावरून स्पष्ट झाले आहे की, खासदार प्रीतम यांच्यासह पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सोनवणे यांच्या उमेदवारीचा धसका घेतला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*