खोतकर म्हणजे शिवसेनेचे मांजर : बच्चू कडू

औरंगाबाद :

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर लढणार होते. त्यांना प्रहारचा पाठिंबा होता. मात्र, त्यांनी साटेलोटे करीत ऐनवेळेस माघार घेऊन शिवसेनेचे वाघ नाही तर, मांजर असल्याचे दाखवून दिल्याची जहरी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.

पैठण येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना कडू यांनी दानवे यांच्याविरोधात जालना येथून उमेदवारी करण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, दानवे ही एक वाईट प्रवृत्ती आहे. ती ठेचण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवीत आहोत. पैशांनी कमी असलो तरीही कार्यकर्ते माझ्यासाठी लढणार असल्याने आमचा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*