गांधींची बंडखोरी; नगरमध्ये भाजपला झटका

अहमदनगर :

कार्यकर्ता मेळाव्यात नगर जिल्ह्यातील भाजप आणि खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उतरण्यासाठी समर्थन दिल्याने गांधी गटाने बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार गांधींचे पुत्र सुवेंद्र या लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढणार असल्याचे याच मेळाव्यात जाहीर करण्यात आले आहे.

काँग्रेसचे बंडखोर डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी मिळाल्याने गांधी गटाने ही बंडखोरी केली आहे. ही बंडखोरी पेल्यातले वादळ ठरणार की निवडणुकीत विजयासह किंवा भाजपाच्या उमेदवाराला घेऊन डुबणार याकडे राज्याचे लक्ष असणार आहे. त्यामुळे नगरच्या जागेसाठी दुरंगी नाही, तर बहुरंगी लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*