विखेंसह भाजपाला जोर का झटका..!

अहमदनगर :

भाजपने नगर मतदारसंघात विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना उमेदवारी डावलल्यामुळे भाजपमधील निष्ठावंत दुखावले आहेत. काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या डॉ. सुजय विखे यांना मतदान न करतानाच माजी नगरसेवक व खासदार गांधींचे पुत्र सुवेंद्र यांना अपक्ष उमेदवारी लढविण्याची तयारी भाजपमधील एका गटाने केली आहे.

काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. विखेंना उमेदवारी दिल्यावर गांधी व त्यांचा गट शांत राहण्याचा अंदाज भाजपचा होता. मात्र, त्यांनी बंडाचे निशाण फडकविले आहे. त्याला निष्ठावंत गटाचाही पाठिंबा असल्याचा गांधी गटाचा दावा आहे. या घडामोडीमुळे भाजपसह विखे गटाला जोरदार झटका बसला आहे. सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष उमेदवारी केल्यास भाजपचे निष्ठावंत व इतर सहानुभूती यातून विजयी होण्याचे गणित काहीजण मांडीत आहेत. अशावेळी येथील बहुरंगी लढतीकडे राज्याचे लक्ष राहणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*