भाजपच्या प्रचाराची धुरा लष्कर व राष्ट्रवादावरच..!

कोल्हापूर :

पुलावमा हल्ला किंवा भारतीय लष्कर यांचे राजकीय कारणास्तव वापर रोखण्याचे आव्हान देशातील विचारी जनता व निवडणूक आयोगाने केले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत भाजपने याच मुद्यावर भर देत प्रचाराचे घोडे दमटले आहे.

कोल्हापूर येथील पहिल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात धमक आहे. त्यांच्यामुळेच भारतीय लष्कराच्या कारवाया सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या नावात फक्त शब्द आहे. भाजप हाच राष्ट्रवादी विचारांचा पक्ष आहे. काँग्रेस व पाकिस्तान एकसारखे आहेत. तेच फक्त सर्जिकल स्ट्राईक आणि इतर पुरावे मागत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*