Blog | तर ती असेल गांधीची राजकीय आत्महत्या..!

डाॅ. सुजय विखे यांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे तिकीट कापले आणि सुजय यांना तिकीट दिले. यानंतर राष्ट्रवादीने ताबडतोब नगरचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहिर केली. तोपर्यंत दिलीप गांधीचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनीही स्वतःची उमेदवारी जाहिर केली. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचा तिढा आणखी वाढला आहे.

कोण आहेत सुवेंद्र गांधी…
नुकत्याच झालेल्या अहमदनगर महापालिका निवडणूकीत ते नगरसेवक पदासाठी ऊभे राहिले होते. सभवेत दुसऱ्या वाॅर्डमधून त्यांच्या पत्नीही ऊभा राहिल्या होत्या. परंतु, खासदारपुत्र असुनही ते निवडून आले नाहीत आणि त्यांच्या पत्नीचाही पराभव झाला. एकाच घराने दोन उमेदवार दिले परंतु, एकही निवडून आला नाही अशी टीका यावेळी गांधीवर झाली. हीच त्यांच्यासाठी नकारात्मक बाब आहे.

गांधीना उमेदवारी न मिळाण्याचे हे पण कारण होते. दिलीप गांधी स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकले नाही याचा विचार पक्षश्रेष्ठींनी केला होता. आणि सुवेंद्र निवडून आले नाहीत त्याचा उमेदवारीवर परिणाम होणार असे भाजपच्या जिल्हा पदाधिकारी खाजगीत सांगत होते.

सुवेंद्र गांधीची राजकीय आत्महत्या…

समोर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्यासारख्या तुल्यबळ ऊमेदवारांसमोर महापालिका निवडणुकीत अयशस्वी झालेले सुवेंद्र कितपत तग धरतील, असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांनाच पडला आहे. त्यांचा जनसंपर्कही प्रभावी नाही. चाळीस वर्षांपासून भाजपशी असलेली एकनिष्ठता झुगारून लावल्यामुळे पुन्हा गांधींना भाजपमधे स्थानही मिळणार नाही. कमकुवत जनसंपर्क, राजकीय खेळी करण्यात अयशस्वी, राजकीय जबाबदारी आणि आत्मविश्वासाचा अभाव याच त्यांच्यासाठी विरोधाच्या बाजू ठरल्या आहेत. यासर्व गोष्टी असताना पुढील महापालिका निवडणूकीत दिलीप गांधी यांना जबाबदारी मिळेल की नाही यावर सुवेंद्र यांचे तिकीट अवलंबून असेल.

अशा पार्श्वभूमीवर दिल्लीच्या भाजप युवा नेत्याने दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. त्यांनी म्हटले आहे की, सुवेंद्रला कुणी ऊभा राहा पण म्हणणार नाही आणि उमेदवारी मागे घे पण म्हणणार नाही.

लेखक : विनोद सूर्यवंशी (सामाजिक-राजकीय अभ्यासक)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*