जगताप-विखे भिडले; ‘सुजयपर्व’वाल्यांना कायदेशीर नोटीस

अहमदनगर :

भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचाराला आता कार्यकर्ते व विखे गटाच्या यंत्रणेने गती दिली आहे. तर, राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनीही भेटीगाठींसह सोशल मीडियावर प्रचाराची राळ उडवून दिली आहे. दोन्ही गट एकमेकांना भिडले असून त्यामुळेच हा संघर्ष आता टिपेला पोहचला आहे.

सुजयपर्व, विनायक सोबले व डॉ. सुजयदादा विखे पाटील फॅन्स या पेजवरून आमदार अरुण काका जगताप व संग्राम जगताप यांची जाणीवपूर्वक बदनामी करून आचारसंहिता भंग केला गेल्याची नोटीस जगताप यांचे वकील प्रसन्न जोशी यांच्यामार्फत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निलेश बांगरे यांनी पाठविली आहे. काही फेसबुक पेजवरून विखे यांना समाजसेवक म्हणताना जगताप यांच्या नावाखाली समाजकंटक असे म्हटले आहे. त्यासह इतरही काही इमेजेसवर आक्षेप घेत जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी कायदेशीर मार्ग अवलंबण्याची तयारी केली आहे. त्यामुळे विखे-जगताप यांचा संघर्ष यंदा टिपेला पोहोचण्याची शक्यता आहे. त्यात विजयी कोण होणार, याकडे राज्याचे लक्ष राहील.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*