लोकसभेची निवडणूक अडकली ‘गोकुळा’त..!

कोल्हापूर :

जिल्हा दुध संघ अर्थात गोकुळ आणि कोल्हापूरचे राजकारण यांचे नाते घट्ट आहे. त्याचीच प्रचीती यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही येत आहे. येथील राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना लढतीच्या केंद्रस्थानी गोकुळ आल्याने या गोकुळात कोण फुलणार आणि मतदार कोणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, राधानगरी, कागल आणि चंदगड या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन शिवसेनेकडे, एक भाजपकडे आणि दोन राष्ट्रवादीकडे आहेत. सध्या येथे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि त्यांचे काका माजी आमदार महादेव महाडिक यांचे वर्चस्व असल्याचे बोलले जाते. मात्र, कागदावर याच्या अगदी उलट चित्र आहे. त्यामुळेच यंदा महाडिक गटाला ही लोकसभा निवडणूक जड जाण्याची चिन्हे आहेत.

महाडिक यांच्या विरोधात सेनेने इथे प्रा. संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली आहे. येथील तीन आमदार आणि नुकतीच झालेली महाआघाडीची सभा यामुळे मंडलिक यांचे कार्यकर्ते विजयाचे दावे करीत आहेत. अशावेळी ही निवडणूक महादेवराव महाडिक आणि शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्यातील शीतयुद्धामुळे गोकुळ दुध संघाच्या मुद्यावर येऊन ठेपली आहे. खासदारकीसह गोकुळ ताब्यात ठेवण्यासाठी महाडिक गट आक्रमक आहे. तर, गोकुळमध्ये महाडिकांचा जीव का गुंतला आहे, याचे अर्थपूर्ण गणित मांडून सेनेचे नेते व कार्यकर्ते प्रचारात भिडले आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*