राधाकृष्ण विखे काँग्रेसचे स्टार प्रचारक

मुंबई :

मुलगा डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे हे भाजपात प्रवेश करतील असे चित्र असताना त्यांना काँग्रेसने स्टार प्रचारक बनवले आहे. हे स्टार प्रचारक स्वतःच्या जिल्ह्यातच प्रचार करायला राजी नसताना त्यांना स्टार प्रचारक कसे बनवु शकतात असा प्रश्न नगरमधील काँग्रेस जनांना पडला आहे.

तसेच काँग्रेसच्या काही पदाधिकार्यांना या निवडीमुळे धक्का बसला आहे. मुलगा भाजपात आणि वडिल काँग्रेसमधे अशी अवस्था आहे. या अवस्थेत जे मुलाला काँग्रेस मधे थांबवू नाही शकले ते काँग्रेससाठी मत कुठल्या तोंडाने मागणार असा प्रश्न सामान्य जनतेला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*