पुण्यामधून चव्हाण की बागवे..?

पुणे :

भाजपने पुणे शहरातून पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देऊन प्रचारात आघाडी घेतली आहे. तर, आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडे असलेल्या या जागेवर अजूनही उमेदवार जाहीर झालेला नाही. सध्या या जागेसाठी अरविंद शिंदे, रमेश बागवे, प्रवीण गायकवाड, मोहन जोशी व अभय छाजेड यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, आता अनेकांनी या जागेवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याही नावाचा आग्रह धरला आहे.

महाराष्ट्र राज्यातील पुणे या एकमेव जागेचा तिढा काँग्रेस सोडवू शकलेली नाही. भाजपने येथून जातीचे कार्ड फेकत शहरात सर्वाधिक प्रभावी असलेल्या ब्राह्मण जातीचे पालकमंत्री बापट यांना उमेदवारी दिली आहे. या ब्राह्मण कार्डला टक्कर देण्यासाठी मराठा किंवा दलित उमेदवार देऊन विजयाची दावेदारी करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. त्यातूनच आता पुन्हा एकदा चव्हाण यांचे नाव पुढे आले आहे.

येथून सध्या शिंदे, गायकवाड, बागवे अशी फक्त तीन नावे अंतिम यादीत आहेत. त्यापैकी एकास किंवा ऐनवेळी चव्हाण यांना उमेदवारी देऊन दमदारपणे पुण्यात उतरण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*