शरद पवार सर्वाधिक भ्रष्ट राजकारणी; विकीपिडीयावर खोडसाळपणा

अहमदनगर :

निवडणूक म्हणजे राजकीय डावपेचांचा सुवर्णकाळ. सत्ता हेच सूत्र घेऊन राजकारणात सक्रिय असलेल्यांचा हा उत्सव. अशावेळी खरे-खोटे आणि दिशाभूल करणारे आरोप आणि कृती ठरलेली असते. तसाच प्रकार विकिपीडियावर केला जात आहे. त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सर्वाधिक भ्रष्ट ठरविण्याचा प्रयत्न झाला आहे.

सध्याच्या निवडणुका इंटरनेटवर जास्त चालू आहेत. समाज माध्यमांचा पुरेपूर उपयोग प्रत्येक पक्ष करून घेत आहे. स्वतःच्या फायद्यासोबत ईतरांच्या नुकसान करण्याचाही पुरेपूर प्रयत्न केला जात आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सर्वाधिक भ्रष्टाचारी राजकारणी आहेत असं विकीपिडीया वर लिहीलेलं आढळत आहे. कोणीतरी जाणीवपूर्वक पवारांना बदनाम करण्याचे काम करत आहे असे कार्यकर्त्यांचे म्हणने आहे.

विकीपिडीयावर कोणीही माहिती टाकू शकतो व त्यात दुसरा व्यक्ती लगेचच बदलही करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारची बदनामी करणे सहज शक्य होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर विकीपिडीयावर अशी माहिती दिसल्याने आता विकीपिडीयावर विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न सामान्य लोकांना पडला आहे.

यापूर्वीही असे प्रकार अनेक दिग्गज नेत्यांबाबतीत झाले आहेत. आणि ऐन निवडणुकीच्या धामधुमीत असे प्रकार होत असतील तर सामान्य लोकांनी माहिती पुन्हा एकदा चेक करून घ्यावी असे आवाहन डिजीटल मिडीयावर केले जात आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*