वाटते पवार पंतप्रधान व्हावेत पण : पाचपुते

अहमदनगर :

राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष, पवार साहेबांचे शिष्य आणि सध्या भाजपवासी असलेले बबनराव पाचपुते यांनी पवारांबद्दल आदर व्यक्त करत टीकाही केली आहे. पवारसाहेब पंतप्रधान व्हावेत असे आजही वाटते पण ते 1991 च्या निवडणुकीत गुंतलेले आहेत. त्यामुळे ते नव्हे तर मोदीच पंतप्रधान होतील असे ते सुजय विखे यांच्या प्रचारावेळी बोलत होते.

तसेच सुजय हे राष्ट्रवादीची उमेदवारी स्विकारणार होते पण मिच त्यांना सांगितले की, भाजपात जा कारण भाजप हा जिंकणारा पक्ष आहे. यावेळी सुजय विखे, बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते, अण्णा शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*