राजकारणाच्या पटावर खेळ उखाण्यांचा…

मागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका कार्यक्रमात ऊखाणा घेतल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. “माझी काय बिशात, प्रतिभा माझ्या खिशात” असं म्हणत पवारांनी ऊखाणा घेतला. यानंतर सुप्रियाताईंनी येऊन सारवासरव केली आणि पुन्हा हशा पिकला.

याच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आमदार पत्नी कांचन कुल यांनाही एका अशाच प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीत एका स्टेजवर आधी सर्व भाजप पदाधिकारी आणि मान्यवरांचे ऊल्लेख केला. आता शेवटी त्यांचे पतीचे नाव आले आणि त्या एकदम शांत झाल्या.

पदाधिकारी आणि उपस्थितांच्या लक्षात येताच “आता ऊखाणाच घ्या” असा आग्रह कांचन कुल यांना धरला. यावेळी गमतीचे वातावरण उपस्थितांमधे होते. शेवटी आमदार राहुलदादा कुल असा नामोल्लेख करत त्यांनी पुढे भाषण सुरू केले. राजकारणात अगदीच नवख्या असल्याने त्यांना या अडचणी येत आहे. अशातंच त्यांची फाईट मातब्बर राजकारणी सुप्रिया सुळे यांच्याशी होणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*