Blog | बिकट वाटच नसावी वहिवाट..!

दिनांक २३ मार्च रोजी ललित कला केंद्र येथे झालेल्या बिकट वाट वहिवाट हे नाटक पाहायची संधी मिळाली. व्यंकटेश माडगूळकर यांच्या लेखणीतून उतरलेल हे नाटक संस्थेचे प्राध्यापक अजित साबळे यांनी दिग्दर्शित केले आहे तर नाटकातील संगीत शेवटच्या वर्षातील विद्यार्थी प्रभाकर मठपती आणि केतन देशपांडे यांनी केले आहे. यावेळी माडगूळकरांच्या कन्या ज्ञानदा नाईक यासुद्धा येथे उपस्थित होत्या. नाटकातील प्रत्येक नट आपल्या व्यक्तीरेखे सकट एकरुप होऊन काम करताना दिसतात. नाना सोनाबाई, राधा, भामा, पुतळा, गौरी, बिन्टि अशी अनेक वेगवेगळी पात्र या सर्वांनी अगदी दर्जा अभिनयाने जीवंत केली आहेत.

व्यंकटेश माडगूळकर यांच्या लेखणीतून उतरलेल हे नाटक न्युयाॅर्क येथील ‘फिडलर ऑन द रुफ’ या संगीत नाटकावर आधारित आहे. परंतु माडगूळकरांनी याचं मराठीत अवलंब करताना फार उत्कृष्ट रित्या संदर्भाची आणि परिस्थितीचा आधार घेऊन लिहिले आहे. नाटकातील प्रत्येक पात्राची एक वेगळी लखब माडगूळकरांनी फार रंजकतेने उतरवले आहे.

बिकट वाट..’चा काळ हैदराबाद संस्थान विलीन होण्याआधीचा आहे. मोगलाई मुलखात, संस्थानाच्या सरहद्दीनजीक अनेक लहान लहान खेडी वसली होती. या खेडय़ांना पठाण व अरब हल्ल्यांपासून धोका होता. रझाकार चढाईमुळे गावे ओस पडत होती. मूळ रहिवाशांना पिटाळून लावण्याचे डाव रचले जात होते. अशा पाश्र्वभूमीवर फुलगाव नावाच्या छोटय़ा खेडय़ात हे नाटक घडते. नाना गवळी, त्याचे कुटुंब आणि त्याचे छोटे गाव यांची कथा नाटकात सांगितली आहे. सगळे वहिवाटीनुसार वागणारे. परंपरा पाळणारे. नाना गवळी आपल्या दारिद्रय़ाचा हसत हसत सामना करतो. पाच पोरींच्या लग्नाच्या विवंचनेला धैर्याने तोंड देतो. आणि बायकोच्या आणि गावकऱ्यांच्या बरोबर आला दिवस गाणी गाऊन साजरा करतो. रझाकारांच्या धास्तीचे सावट फुलगावला अधूनमधून झाकोळून टाकते. यात नानांच्या तीनही मुली वहिवाटी विरुद्ध जाऊन स्वत:च्या मनाप्रमाणे आवडत्या मुलाशी लग्न करतात आणि परिस्थितीचा सामना करणारा नाना मुलीच्या डोळ्यातलं प्रेम पाहून त्यांना परवानगी देतो पण पुतळा म्हणजेच त्यांची दुसरी मुलगी पठाणशी पळून जाऊन लग्न करते तेव्हा नाना तिचा स्वीकार करत नाही आणि अखेर रझाकारांच्या अन्यायाला कंटाळुन जेव्हा सगळी माणसं गाव सोडून जातात तेव्हा नाना हि गाव सोडतो आणि अखेर पुतळा आणि फकिरा यांच प्रेम स्वीकारतो आणि त्यांना आशिर्वाद देतो.
गाव सोडून जाताना सगळे जमतात आणि गाणं म्हणतात की
‘काय आम्ही हरवले आणि काय मागे राहिले?
काही नाही आमचे लहानगे फुलगाव.
आणि अखेर नाना आपला संसाराचा गाडा ओढत निघून जातो.

पंकज नाईकवाडे, माध्यम अभ्यासक

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*