Blog | शिष्याची गुरूदक्षिणा, जेष्ठांना बाहेरचा रस्ता

राजकारण म्हणजे फक्त कुरघोडी आणि एकमेकांना फसविण्याचा डाव, अशीच नवी व्याख्या बनली आहे. आपल्याला बोटाला धरून या क्षेत्रात आणणाऱ्या आणि उभारी देणाऱ्यांचीही कदर न करण्याचा नवा राजकिय कानमंत्र रूढ होत आहे. वय झाले म्हणून एखाद्याला तिकीट नाही दिले तर समजू शकते. पण त्याला किमान प्रचाराला तरी मनाचे पान देण्यास काय हरकत आहे..?

भाजपच्या जेष्ठ नेत्यांना स्टार प्रचारक म्हणून तर घेतले नाहीच वरून लोकसभेचे तिकीटही नाकारले. स्वतःच्या ऊमेदीचा काळ ज्यांनी एखादी संस्था, संघटना, पक्ष ऊभा करण्यात घातला असेल आणि पक्षाच्या चांगल्या काळात याच जेष्ठांना खड्यासारखे निवडून काढले जात असेल तर त्यांच्याईतकी वाईट अवस्था कुणाचीच नाही. अशीच अवस्था लालकृष्ण अडवाणी आणि डाॅ. मुरली मनोहर जोशी यांची झाली आहे. ज्या पक्षासाठी जिवाचे रान केले आता त्याच पक्षाच्या प्रचार करण्यावर बंदी यावी असा काय गुन्हा त्यांनी केला असेल हे पक्षश्रेष्ठीच जाणो.

अडवाणी अजुनही या विषषयावर मौन बाळगून आहेत. तर जोशी हे नेहमीप्रमाणे अडगळीत टाकले तरी बोलत आहेत. याच्याच विरूद्ध अवस्था काँग्रेसमधे आहे. काँग्रेसमधे हायकमांड असल्याचे तोटे असले तरी तेच काँग्रेसचे बलस्थान असु शकते. कारण सध्या काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत जुनीजाणती मंडळी आहेत. किमान त्यांना अडगळीत टाकण्याचा कुटील डाव तर हा पक्ष करीत नाही.

काँग्रेस चांगली की वाईट हा वादाचा मुद्दा असू शकेल. पण किमान त्यांना अपल्यांची तरी कदर दिसते. भाजपचे कार्य अगदीच याच्या उलट. आताही तिथे जोमात असलेले नेते वयाने मोठे झाल्यावर त्यांना अडगळीत टाकले जाणार, हाच संदेश ही राजकीय संस्था तर देत नाही ना..?

विनोद सूर्यवंशी (सामाजिक-राजकिय अभ्यासक),अहमदनगर

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*