म्हणून कार्डिलेंच्या कार्यकर्त्यांची उडाली तारांबळ..!

अहमदनगर :

राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डीले यांची या लोकसभा निवडणुकीत मोठी गोची झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन त्यांची तारांबळ उडाली आहे.

कर्डीले यांची नगरच्या दक्षिण भागात सर्वाधिक मोठी ताकद आहे. नगर शहरासह तालुका आणि पाथर्डी व राहुरी तालुक्यावर त्यांची पकड मजबूत आहे. श्रीगोंदा व पारनेर या दोन विधानसभा मतदारसंघात कोणाला विजयी करायचे आणि कोणाला पडायचे याचेही गणित कर्डीले व त्यांचे कार्यकर्ते ठरवितात. एकूणच सध्याची स्थिती पाहता सहापैकी चार विधानसभा मतदारसंघात कर्डीले हीच मोठी ताकद आहे. मात्र, आता हीच ताकद नेमकी कोणासाठी वापरली जाणार, यावर लोकसभेच्या विजयाचे गणित ठरणार आहे.

नगर भागात भाजपचे कर्डीले आणि त्यांचे व्याही काँग्रेसचे भानुदास कोतकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अरुण काका जगताप या तिघांची ताकद आहे. त्यांचे कार्यकर्तेही बऱ्याचदा अशाच ताकदीने राहतात. मात्र, यंदा कर्डीले यांच्या भरवशावर डॉ. सुजय विखे यांना पक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी दिली आहे. त्यांना विजयी करण्याची क्षमता कर्डीले यांच्यात आहे. मात्र, राष्ट्रवादीने कर्डीले यांची कोंडी करीत जावई आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. सध्या त्यामुळेच कार्डिलेंचे कार्यकर्ते भाजपत असूनही जगताप यांच्या प्रचारात सक्रिय आहेत.

त्याचवेळी कर्डीले मात्र डॉ. सुजय विखे यांचा प्रचार करीत आहेत. तर, त्यांचे पुत्र आणि कुटुंबीय यापैकी एकाच्याही प्रचारात जगजाहीरपणे आलेले नाहीत. अशा कात्रीत कार्यकर्ते आतला आवाज ऐकून जावयांच्या मागे ताकद उभी करीत आहेत. हे कर्डीले यांना कितपत मान्य होणार, यावर प्रचाराची दिशा ठरणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*