म्हणून विखेंना व्हावे लागले सक्रिय..!

अहमदनगर :

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले कोणाचा प्रचार करणार याबद्दल नगर मतदारसंघांमध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. कर्डिले स्वतः सुजय विखे यांचाच प्रचार करणार असल्याचे सांगत असले तरी, त्यांचे कार्यकर्ते सध्या त्यांचे जावई आमदार संग्राम जगताप यांचा प्रचार करीत आहेत. हे चित्र पाहूनच मुलासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील नगरच्या प्रचारात सक्रिय झाल्याची चर्चा आहे. भाजपची यंत्रणाही आता विखेंसाठी जोरात कामाला लागली आहे.

नगर दक्षिण भागात कर्डिले गटाचे वर्चस्व आहे. मात्र, जावयाचा प्रचार करायची की पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी भाजपा उमेदवार सुजय विखे यांचा प्रचार करायचा अशी द्विधा मनस्थिती अनेकांची आहे. त्याचे दुष्परिणाम सुजय विखे यांच्या प्रचारावर दिसत आहेत. त्यामुळे ते सध्या काहीसे बॅकफूटवर असल्याचे चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी वडीलकीच्या नात्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. स्वतः राधाकृष्ण विखे प्रचारात सक्रिय झाल्याने भाजपसह सुजय विखे यांच्या आशा उंचावल्या आहेत. आमदार कर्डिले हेही सुजय विखे यांच्या बरोबर आहेत. मात्र, त्यांचे कार्यकर्ते कोणाबरोबर जाणार यावरच नगर दक्षिणेतील विजयाचे गणित ठरणार असल्याची मतदारांमध्ये चर्चा आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*