
मुंबई :
गेली पाच वर्षे शिवसेनेमध्ये भाजपच्या बद्दल एकाच नेत्याबद्दल सर्वात जास्त रोष होता तो नेता म्हणजे किरीट सोमय्या होय. सतत शिवसेनेवर टीका केल्यामुळे युती झाली तरी किरीट सोमय्या यांचे तिकीट फिक्स होत नाहीये. आता सोमय्या हे उद्धव ठाकरेंची भेट मागत होते. परंतू ठाकरे यांनी भेट देण्यास नकार दिलेला आहे. सोमय्या यांच्या भेटीसाठी मिलींद नार्वेकर, भाजपकडे नुकतेच आलेले नगरसेवक प्रवीण छेडा हे प्रयत्नशील होते. परंतू शिवसेना नेते संजय राऊत यांनी हि भेट होणार नाही असे त्यांना सांगितले.
भाजपची यादी जाहिर झाली तरीही कीरीट सोमय्या यांचे नाव येत नाही. पण वेळोवेळी पक्षाची बाजू मांडून सुद्धा पक्ष त्यांची बाजू सेनेपुढे का मांडत नाही असा प्रश्न समोर आहे. आता येत्या यादीत तरी भाजप किरीट सोमय्या यांना तिकीट देते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Be the first to comment