समाजाची ताकद भोर यांच्या पाठीमागे : वाघ

अहमदनगर :

सर्वसामान्य माणसाची साथ मिळाल्यास आपल्या ताकदीचा आवाका लक्षात येईल. या निवडणुकीत यश अपयश महत्वाचे नसून यापुढील मार्गक्रमण करताना दिशादर्शक ठरणार आहे. संजीव भोर साहेबांच्या मागे उभी असणारी ताकद पुढील सामाजिक वाटचालीला उभारी देणारी असेल, असे मत डॉ. संदीप वाघ यांनी व्यक्त केले.

नगर येथील कोहिनुर मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी उपस्थिती लावली. मराठा संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी करण्यास इच्छुक आहेत. त्यादृष्टीने त्यांनी बांधणी सुरू केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*