शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे : शेलार

मुंबई :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरून येते असे सांगत राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक माध्यमातून टीका केली जात आहे. यात भाजपच्या आशिष शेलारांनी ट्वीटरचे माध्यम निवडले आहे.

‘शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे’ असे म्हणत नाव न घेता मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवने हेही शिवसेनेत गेले असल्याने यावरूनही टोला लगावला आहे.
मनसेने निवडणुकीत उतरणार नसल्याने त्याचा फायदा हा आघाडीला होणार आहे. त्यामुळे युतीचे नेते पेटून ऊठलेले आहेत. शक्य होईल तिथे राज ठाकरेंवर टीका करण्याची संधी ते शोधत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*