मतदारसंघातील ही लढाई न्यायालयामध्ये

23 नाही तर 24 मे ला लागणार लोकसभा निवडणुकांचे निकाल…!

दिल्ली :

व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम याची पडताळणी व्हावी अशी याचिका विरोधीपक्षातील नेत्यांनी दाखल केली आहे. आता मतदारसंघातील ही लढाई न्यायालयामधे पोहोचली आहे.

व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम यंत्रावर शंका उपस्थित केली जात होती आणि आता हीच शंका घेऊन आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू समवेत ईतर 21 दिग्गज नेत्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांची हि मागणी मान्य झाल्यास निकाल एक दिवस पुढे ढकलला जाईल. आणि 24 तारखेला निकाल घोषित होऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयात हि याचिकेवर 1 एप्रिलला सुनावनी होईल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*