शिंदे-निंबाळकर यांच्यात लढत; मोहिते आउट

पुणे :

सोलापूर जिल्ह्यातील माढा या चर्चेतील मतदारसंघात अखेर भाजपने मोहिते गटाला डावलून नव्याने भाजपवासी झालेल्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात लढत रंगणार आहे.

आधी शरद पवार येथून लढणार असल्याने हा मतदारसंघ देशभरात चर्चेत आला. मात्र, पवार यांना लक्ष्य करीत खासदार विजयसिंह मोहिते पाटील व त्याचे पुत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी रान उठविले. त्यामुळे येथून पवार लढणार की नाही याबद्दल संभ्रम होता. त्यातच नातू पार्थ पवार मावळ येथून रिंगणात उतरल्यावर कुटुंबातील जास्त उमेदवार नको म्हणून पवार यांनी माघार घेत घेतली. त्याचवेळी मोहिते गटाने भाजपवासी होत धक्का दिला. त्यामुळे पवार यांनी संजय शिंदे यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली. तर, भाजपने मोहिते पाटील गटाला डावलून नव्याने काँग्रेसमधून आलेल्या निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*