आज ठरणार पुणे कॉंग्रेसचा उमेदवार

पुणे :

लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार याद्या जाहीर होत असतानाच पुण्यातून काँग्रेस पक्ष कोणाला उमेदवारी देणार याबद्दल महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे. मात्र, आता पुण्यातील उमेदवार जाहीर करण्याचा मुहूर्त ठरला असून आज किंवा उद्याच त्यांची घोषण दिल्लीतून केली जाणार आहे.

मराठा समाजासाठी काम करणारे नेते प्रवीण गायकवाड आज मुंबईत काँग्रेस पक्षात अधिकृतरीत्या प्रवेश करीत आहेत. त्यानुसार त्यांनाच येथून उमेदवारी मिळण्याचा दावा अनेकांनी केला आहे. मात्र, हि उमेदवारी त्यांना मिळणार की नाही, हे लवकरच समजेल, असे सूचक वक्तव्य प्रदेश काँग्रेस नेत्यांनी अजूनही उत्सुकता ताणली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*