वसंतदादा घराण्यावर जयंत पाटलांची टीका

सांगली :

जनता इतिहास नाही तर कर्तृत्व पाहाते अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वसंतदादा घराण्यावर केली.

येडेमच्छिंद्र येथे ही प्रचारसभा चालू होती. राजू शेट्टींचा प्रचार प्रारंभ याठिकाणी झाला. चाळीस वर्षांपूर्वी वाद झाले, नंतर मिटलेही. आता इतिहासातील घटनांना महत्व देण्यात अर्थ नाही. राजारामबापू गट आणि वसंतदादा गट यांनी वाद सोडून एकत्र यायला हवे असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी सभेच्या सुरूवातीलाच केले होते.

माझा वैयक्तिक कुणाशीही वाद नाही. सगळ्यांशी चांगले संबंध आहेत असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*