सोमवारी होणार विशेष घडामोडी; उलथापालथ ठरविणार निकाल..!

मुंबई :

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या जागांसह महाराष्ट्र राज्यातील सर्वच 48 जागांसाठी आता जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. पुणे व सांगली मतदारसंघात काँग्रेस गोंधळलेल्या अवस्थेत असतानाच आघाडीला भरारी देणाऱ्या पडद्यामागील घडामोडी घडत आहेत. तर, युतीलाही सुखद धक्का देणाऱ्या घडामोडी येत्या सोमवारी घडणार आहेत. त्याच घडामोडी राज्यातील लोकसभेचा निकाल ठरविणार आहेत.

राजकारणात कोण कसा लढतोय, यापेक्षा कोण विजयी होतो यालाच महत्त्व असते. त्याचाच प्रत्यय प्रत्येक निवडणुका देतात. यंदाची लोकसभा निवडणूकही त्यास अपवाद नाही. राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप आपल्या जागा टिकवून ठेवण्यासाठी आटापिटा करीत आहे. तर, शिवसेना कमीतकमी डॅमेज होऊन जास्तीतजास्त जागा जिंकून आपली ताकद केंद्रात वाढविण्यासाठी लढत आहे. मनसे हा पक्ष केंद्रातील मोदी-शाह यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी उमेदवार नसतानाही प्रचारात आहे. तर, देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला आणि त्यांच्या आघाडीच्या मित्रपक्ष राष्ट्रवादीला प्रत्येकी किमान दोन अंकी खासदार राज्यातून संसदेत पाठविण्याचे वेध लागले आहेत.

मोदी-शाह यांचे हात बळकट करून आपले स्थान पक्के करण्यासाठीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही लढाई आहे. तर, त्रिशंकू स्थितीत देशात पंतप्रधान हे पद मिळविण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार देव पाण्यात बुडवून बसले आहेत. या सर्व घडामोडींचा वेग आणि मर्यादा निश्चित करण्यासाठी सोमवार हा महाराष्ट्र राज्यातील राजकिय घातवार ठरणार असल्याचे मुंबईत खात्रीशीर सूत्रांनी म्हटले आहे.

पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, बीड, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अमरावती व वर्धा यासह अनेक जिल्ह्यात सोमवारी मोठ्या उलथापालथ होणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला ताकद मिळण्यासह यामुळे सेनेला मोठा झटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*