नगरमध्ये संजीव भोर यांनी भरला अर्ज

अहमदनगर :

लोकसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली असून, आतापर्यंत 23 उमेदवारी अर्ज नेलेले आहेत. त्यापैकी मराठा क्रांती मोर्चाचे नेते इंजिनिअर संजीव भोर यांनी अर्ज दाखल केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात सजीव भोर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. इतर कितीजण अर्ज भरतात यावर येथील बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. भोर यांनी विविध मराठा संघटना, बहुजन विचारांच्या संघटना व शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवीत असल्याचे म्हटले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*