पवारांचे राजकारण संपविणार : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर :

गिरीश महाजन यांनी बारामती जड नाही असे वक्तव केले. पाठोपाठ आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही शरद पवारांना राजकारण संपवणार आणि मीच संपवणार असा ईशारा दिला आहे. पवारांना दिल्लीत घर शोधावे लागेल अशीही बोचरी टीका पाटलांनी केली. या टीकेनंतर मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते संतापले आहेत.

यानंतर ट्वीटरचा ऊपयोग करत ‘शंभर भुंकणारी कुत्री वाघाची शिकार करू शकत नाहीत’ असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पाटलांना लगावला आहे. आता या खरमरीत टीकेला चंद्रकांत पाटील किंवा ईतर भाजप नेते काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*