‘सुप्रियाताई व दादांना दिलेला शब्द इंदापूरकर पूर्ण करणार’

इंदापूर (पुणे) :

बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार माझ्याकडे घरी येऊन गेले होते. त्यांना त्यावेळी आघाडी धर्म पाळण्याचा शब्द दिला आहे. त्यानुसार इंदापूरकर हा शब्द नक्कीच पूर्ण करतील, असा विश्वास ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.

पत्रकार परिषद आयोजित करून हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत आपली भूमिका काय असेल हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा जीव भांड्यात पडला आहे. इंदापुरमध्ये काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील आघाडी धर्म पाळणार का या चर्चांना पूर्णविराम देत काँग्रेस सर्वशक्तीनिशी राष्ट्रवादीच्या पाठीशी उभी असणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*