भारतीय लष्कर म्हणजे मोदी सेना; योगी यांचे वादग्रस्त वक्तव्य

दिल्ली :

केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांच्या प्रचारादरम्यान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय लष्कराला मोदी सेना म्हटले आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची दखल घेत निवडणूक आयोगाने गाजियाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सविस्तर अहवाल मागितला आहे.

भारतीय सेनादलाच्या कर्तृत्वाचा निवडणूक प्रचारादरम्यान पक्षासाठी उपयोग न करण्याची सूचना निवडणूक आयोगाने दिली होती. मात्र, तरीही भाजपकडून वेळोवेळी भारतीय लष्कराबद्दल बोलून त्याचा राजकीय कारणासाठी वापर करण्यात येत असल्याने त्यावर आता आयोग कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*