भाजपकडून सेनादलाचा अपमान : बॅनर्जी

कोलकाता :

उत्तरप्रदेश येथील गाजियाबादमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय लष्कराची संभावना ‘मोदी सेना’ अशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपकडून सेनादलाचा अपमान झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांच्या निवडणूक प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री योगी यांनी भारतीय लष्कर हे मोदी सेना असल्याचे म्हटले आहे. त्याबद्दल निवडणूक आयोगाने गाजियाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयास सविस्तर अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा सरकारकडून देशाचा मानबिंदू असलेल्या सैन्यदलाचा अपमान होत असल्याचे सांगत निषेध व्यक्त केला आहे. भारतीय सेना कोणत्याही एका नेत्याच्या दावणीला बांधली जाणार नाही, भारतीय सेना कर्तव्यदक्ष व कार्यक्षम आहे. सेनादलाचा अपमान भारतीय जनता खपून घेणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*