रिलायन्सवर कारवाई नाही, उलट टोलवाढीचे बक्षीस..!

पुणे :

अडीच वर्षांची मुदत असलेले काम साडेआठ वर्षानंतरही पूर्ण न करणाऱ्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीवर भाजपा सरकारने पुन्हा एकदा मेहरबानी केली आहे. कंपनीला काळया यादीत टाकण्याची घोषणा बाजूला सारीत कंपनीला वर्षभरासाठी टोलवाढीसह वसुलीचे बक्षीस देण्यात आले आहे.

देहूरोड ते सातारा असे सुमारे 140 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम काँग्रेस सरकारच्या कालावधीत 2010 मध्ये सुरू झाले होते. 2013 मध्ये हे काम पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र, त्यानंतरही आतापर्यंत या रस्त्याचे काम सुरू असून छोटे-मोठे अपघात या रस्त्यावर नेहमीच घडत आहेत. याकडे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी लक्ष वेधले होते. त्यावर ऑगस्ट 2016 मध्ये केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा पुणेकरांसमोर दिला होता. मात्र, तो इशारा पूर्ण न करता पुन्हा पुन्हा या ठेकेदारांना मुदतवाढ देण्यात रस्ते विकास मंत्रालयाने विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे पुणे करांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*