लोकसभेत प्रश्न मंडणाऱ्यांमध्ये सुप्रिया सुळे अव्वल..!

पुणे :

परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेतर्फे देशभरातील खासदारांचे रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार लोकसभेत प्रश्न विचारणाऱ्या खासदारांमध्ये पहिला क्रमांक बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पटकावला आहे. विशेष म्हणजे प्रश्न विचारणाऱ्या सजग खासदारांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्रातील खासदार आहेत.

सुप्रिया सुळे यांनी एकूण पाच वर्षांत 1192 प्रश्न विचारले. त्याखालोखाल कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी 1182, सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी 1141, हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी 1126 आणि पुणे जिल्ह्यातील शिरूरचे खासदार आढळराव पाटील यांनी 1107 प्रश्न विचारले आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा राष्ट्रवाडीतर्फे बारामती मतदारसंघातून लढत आहेत. भाजपने त्यांच्याविरुद्ध कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कार्यक्षम व सजग असलेल्या सुळे यांना कुल कशी लढत देतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*