मोदींनी पत्रकार परिषदेला सामोरे जावे : उर्मिला

मुंबई :

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभांमध्ये बोलतात. मात्र, पत्रकार परिषदेला सामोरे जात नाहीत. त्यांना नेमकी पत्रकारांची भीती का वाटते, असा प्रश्न काँग्रेसच्या उमेदवार व सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे.

उर्मिला हिस काँग्रेस पक्षाने भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उत्तर मुंबईत उमेदवारी दिली आहे. त्यांनी बेरोजगारी, वाढती असहिष्णुता आणि गरिबांना होणारा त्रास या मुद्यांवर भाजपला लक्ष्य केले आहे. त्यावर उत्तर न देता मोदी व भाजप भाषणबाजी करीत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. मोदींनी पत्रकारांना सामोरे जाण्याचे आवाहन उर्मिला यांनी केले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*