महाआघाडीचे माप डॉक्टरांच्या पारड्यात ?

अहमदनगर :

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या नगर दक्षिणेतील राजकारण ढवळून निघाले आहे. कोण कोणत्या पक्षात आहे, आणि कोणाचे काम करतोय याचा काहीच ताळमेळ राहिलेला नाही. त्याच नगर तालुक्यातील महाआघाडी या सर्वपक्षीय ताकदवान गटाने भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या पारड्यात वजन टाकल्याची चर्चा आहे.

नगर तालुक्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी अशी महाआघाडी आहे. त्यापैकी आता बहुसंख्य मंडळींनी उघडपणे डॉ. सुजय विखे यांचे काम करण्यास सुरुवात केली आहे. तालुका शिवसेना पूर्ण ताकदीने येथून भाजपला मदत करीत आहे. तर, काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीच्या गटातही काहीअंशी संभ्रम आहे. नगर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट महाआघाडीच्या ताब्यात आहेत. तत्कालीन निवडणुकीत त्यांनी भाजपचे आमदार शिवाय कर्डीले यांच्या विरोधात भूमिका घेऊन एकीची वज्रमुठ आवळली होती. त्यातून कर्डीले गटाला मोठा धक्का बसला होता. आता हीच महाआघाडी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारात सक्रिय झाली आहे. त्यातील काहीजण राष्ट्रवादी उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या संपर्कात आहेत. मात्र, त्यांनी अजूनही उघड भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे नगर तालुक्यात विखे गटाला मोठी ताकद मिळायचे बोलले जात आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*