आघाडीतील फूट गडकरींना फायदेशीर

नागपूर :

नागपूरमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र यायला तयार नाहीत. राज्यातील युतीचा त्यांना गंधही नाही असे चित्र नागपूरमधे दिसत आहे. नागपूरमधे नाना पटोले हे काँग्रेसचे उमेदवार असून त्यांच्या सभेला, प्रचाराला दिसत नाहीत.

नागपूरात भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्यासमोर काँग्रेस कडवे आव्हान निर्माण करणार होते. नाना पटोलेंच्या उमेदवारीने हे आव्हान निर्माण झालेही. पण आता राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमुळे हे आव्हान संपुष्टात येईल असे दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील ही फुट गडकरींना फायद्याची ठरणार हे नक्की आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*