सुजयचा विजय निश्चित होईल; राधाकृष्ण विखेंचा विश्वास

अहमदनगर :

सुजयमध्ये इलेक्टिव्ह मेरिट असल्यानेच त्याला भाजपने उमेदवारी दिली आहे. सर्व विरोधकांचे तो नक्कीच पानिपत करेल असा विश्वास ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

सुजय विखे यांना भाजपने अहमदनगर मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. त्यावर बोलताना न्यूज चॅनेलवर राधाकृष्ण विखे म्हणाले की, सुजयचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय योग्य आहे. सुजयने आतापर्यंत चांगले काम केलं आहे. त्याचा लोकसंग्रह उत्तम आहे. माझा मुलगा म्हणून आम्ही उमेदवारी मागत नव्हतो. तर, त्याच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट आहे, म्हणून त्याला आघाडीकडून उमेदवारी मिळणे आवश्यक होते. मात्र, आता भाजपकडून त्याचा विजय नक्कीच होईल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*