कहाणी में ट्विस्ट | धनश्री विखे यांचाही अर्ज दाखल

अहमदनगर :

डॉ. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचारात आघाडी घेतली आहे. त्याचवेळी आता त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांनीही आज याच मतदारसंघात उमेदवारी दाखल करून सर्वांना धक्का दिला आहे.

डॉ. सुजय विखे यांनी उमेदवारी करतानाच भाजपच्या सर्व गटांची योग्य पध्दतीने मोट बांधली आहे. सुरुवातीला प्रचारात पुढे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुक्कामाने उभारी मिळाली होती. मात्र, खासदार दिलीप गांधी व त्यांचे पुत्र सुजय यांनी आता भाजप उमेदवार म्हणून विखे यांचा प्रचार सुरू केल्याने विखे यांनी विरोधी उमेदवार आणि सर्व पक्षांवर आघाडी घेतली आहे. विखे यांना शह देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी टीमही कामाला लागली आहे. त्यातच आता धनश्री विखे यांची उमेदवारी दाखल झाल्याने काँग्रेस आघाडीचे नेते व कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. विखे गटाचा हा डाव नेहमीप्रमाणेच अनेकांना झटका देणारा ठरला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*